मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाप्रकरणी समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला असून या प्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. समय रैना सध्या परदेशात असल्यामुळे त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे उपस्थित राहून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अवधी मागितला होता. महाराष्ट्र सायबर विभागाने त्याला नकार देत सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले.
समय रैनाला समन्स
