Thursday, January 22, 2026

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयने सहकुटुंब केलं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयने सहकुटुंब केलं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये अनेकांनी भेट देऊन त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं आहे.अशातच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सहकुंटुंब या भव्य सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये पोहोचला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याची खास झलक दाखवली आहे. विवेक ओबेरॉयने त्याची पत्नी प्रियंका तसेच आई आणि दोन्ही मुलांसह महाकुंभमेळ्यात पोहोचून त्रिवेणी संगमात स्नान केलं.

यावेळी विवेकने महाकुंभमेळ्यात परमार्थ निकेतनचे मुख्य स्वामी चिदानंद आणि साध्वी भगवती सरस्वती यांची भेट सुद्धा घेतल्याची पाहायला मिळतेय. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यादरम्यान विवेक ओबेरॉयने माध्यमांसोबत खास बातचीत केली. यावेळी विवेक अभिनेता म्हणाला, "महाकुंभमेळ्यात आल्याने मला आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळाला. हे ठिकाण सकारात्मक उर्जेने परिपूर्ण आहे, शिवाय येथील अध्यात्म जीवनाला नवी दिशा देतं. अशी प्रतिक्रिया त्याने दिली. विवेक ओबेरॉय आता लवकरच 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ'या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा