Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेमहापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर परिणाम

महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर परिणाम

कार्यरत असलेल्या पदांच्या इतकीच रिक्त पदांची संख्या

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या पदांच्या संख्येपैकी कार्यरत असलेल्या पदांच्या इतकीच रिक्त पदांची संख्या असल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे.

महापालिकेत वर्ग १ ते ४ अशा संवर्गाची आकृतीबंधा नुसार २५७० मंजूर पदे आहेत. त्यातील १२३४ पदे कार्यरत आहेत तर १३३६ पदे रिक्त आहेत. वर्ग १ मधील रिक्त पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग प्रसूती तज्ञ, वर्ग २ मध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, वर्ग ३ मध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, वाहन चालक तर वर्ग ४ मध्ये मजूर, रखवालदार अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे.

जे. जे. उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करणार

कार्यरत पदांवरील काही जणांना पदोन्नती मिळाल्याने तर काहीजण सेवा निवृत्त झाल्यामुळे तसेच काहीजणांचे निधन झाल्याने रिक्त पदात वेळोवेळी वाढ होत गेली. तसेच मीरा-सभाईंदर शहर सुध्दा वेगाने वाढत गेले. त्यामुळे महापालिका कामात सुद्धा प्रचंड वाढ झाली. परिणामी रिक्त पदांची उणीव प्रकर्षाने भासू लागली. तसेच त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून नवीन आकृतिबंध मंजूर करण्याच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. याला अनेक महिने उलटले तरी अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. संवर्गाची पदे मंजूर नसल्यामुळे अनेक महापालिका कर्मचारी पदोन्नती पासून वंचित सुद्धा
राहिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -