ड्रंक अँड ड्राइव्ह न करण्याची घेतली शपथ
ठाणे : दारू पिऊन वाहन चालवताना अपघातांची मालिका सुरू असली तरी, तळीराम चालक आजही बेदरकारपणे वाहन चालवताना दिसतात. ठाणे वाहतूक पोलीस तळीराम चालकांवर कारवाई करत असून, आता अशा २२० चालकांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले आहे. या सोबतच ड्रंक अँड ड्राइव्ह करणार नाही अशी शपथ चालकांनी देऊन, प्रत्येक आठवड्यात शालेय, प्रवाशी बस चालक आणि ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना वाहतूक नियमांबाबत प्रशिक्षण देऊन त्यांचे समुपदेशन केले जाते.
रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतूक शाखेने कारवाई सुरू ठेवली आहे. गेल्या काही महिन्यात ड्रंक अँड ड्राइव्ह, हिट अँड रनच्या घटना थांबल्या नाहीत. प्रवासी बससचालकाकडून कुर्ल्याससारखी घटना घडण्याची शक्यता आहे. हे धोके ठाण्यात होऊ नयेत यासाठी वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहन चालकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. युनायटेड वे मुंबई संस्थेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकानांना सुरक्षेचे धडे दिले जात आहेत. घेतलेल्या प्रशिक्षणात ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या २२० जणांना ठाणे, तीन हात नाका येथील पोलीस उप आयुक्त कार्यलयाच्या सभागृहात समुपदेशन करण्यात आले.
Samay Raina : कॉमेडीयन समय रैनाच्या अडचणीत वाढ! आगामी सर्व शो रद्द
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने आणि सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर फडतरे, वाहतूक विभागाचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाकडून हा उपक्रम चालवला जातो. त्यामध्ये शालेय बस चालकांसह ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये पकडल्या गेलेल्या वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि वाहतूक नियमांची माहिती दिली जाते.
उपक्रमांतर्गत प्रशिक्षित झालेले चालक
ड्रंक अँड ड्राइव्ह कसरवार – २२०
ठाणे परिवहन बस – ६०
सिटी फ्लो बस – १०३
मायलो बस – ७२
शालेय बस – ११५
पोस्टर बस – ४