प्रयागराज: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमध्ये दररोज कोट्यावधीच्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहे. येथील मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता प्रयागराजमध्ये ८वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. आठवीपर्यंतच्या शाळा आता १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून आठवीपर्यंतचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जात आङे.
बुधवारी संध्याकाळी दोन कोटींहून अधिक भाविकांचे स्नान
महाकुंभमध्ये पाचवे स्नान पर्व माघी पोर्णिमेला होते. यावेळेस बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २ कोटीहून अधिक लोकांनी गंगा आणि संगमामध्ये पवित्र डुबकी घेतली. या दरम्यान स्नान करणाऱ्या भक्तांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि करण्यात आली.
१३ जानेवारीपासून ते आतापर्यंत ४८.२५ कोटीहून अधिक लोकांनी केले स्नान
मेळावा प्रशानाच्या आकडेवारीनुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २ कोटीहून अधिक लोकांनी संगमात तसेच गंगेमध्ये स्नान केले. महाकुंभची सुरूवात १३ जानेवारीला झाली आहे. आतापर्यंत ४८.२५ कोटीहून अधिक लोकांनी येथे स्नान केले आहे.