ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना
मुंबई : आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिनी म्हणजेच २७ जानेवारी २०२५ रोजी तत्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल अशा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.
HBT Trauma Care Centre : रुग्णांचा रुग्णालयातील प्रतीक्षा कालावधी कमी करा!
या मंडळाच्या माध्यमातून लाखो रिक्षा आणि ऑटो चालकांसाठी भविष्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. राज्यभरातील सर्व रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना ५००/- रुपये नोंदणी शुल्क आणि ३००/- रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्य होता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासद नोंदणी करता येईल. निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत ६५ वर्षावरील सभासद ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये ‘सन्मान निधी’ दिला जाणार आहे.