PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत

वॉशिंगटन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा थाटात सुरू झाला असून, राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.ब्लेअर हाऊससमोर उपस्थित भारतीय समुदायाने 'भारत माता की जय' आणि 'मोदी मोदी'च्या घोषणांनी मोदींचे स्वागत केले.पंतप्रधान मोदी यांनी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांना भेटण्यासाठी आपला उत्साह दर्शवला आहे.


पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशेषतः व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि इमिग्रेशन यासारख्या विषयांवर दोन्ही नेत्यांची चर्चा अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपल्या स्वागताचे छायाचित्र शेअर करून लिहिले की, "थोड्या वेळापूर्वी वॉशिंग्टन डीसीला पोहोचलो. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आणि भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे.



" पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण, ऊर्जा, आणि इमिग्रेशनबाबत व्यापक चर्चा होईल. विशेषतः इमिग्रेशन धोरणाच्या संदर्भात भारतीय नागरिकांसाठी सवलती मिळतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, इंडो-पॅसिफिक आणि युक्रेन व पश्चिम आशियातील घडामोडींवरही मोदी आणि ट्रम्प यांची महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मोदींच्या या ऐतिहासिक भेटीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक