नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या ३ दिवसांचा दौरा संपवून बुधवारी अमेरिकेला पोहोचले. येथे ते डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती बनल्यानंतर पहिल्यांदा भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला पोहोचल्यावर एक्सवर ट्वीट करताना म्हटले, काही वेळापूर्वी वॉशिंग्टन डीसीला पोहोचलो आहे. या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेईन. भारत-अमेरिका व्यापक जागतिक रणनीती भागीदारी पुढे वाढवण्यासाठी काम करेन. यासाठी खूप उत्सुक आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या दौऱ्याची माहिती दिली आहे तसेच दोन्ही देशांदरम्यानचे संबंधाबाबत महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने हे ही सांगितले की पंतप्रधान मोदी अमेरिकेचे कॅबिनेट सदस्य आणि उद्योग जगतातील प्रमुख नेत्यांचीही भेट घेतील.
Landed in Washington DC a short while ago. Looking forward to meeting @POTUS Donald Trump and building upon the India-USA Comprehensive Global Strategic Partnership. Our nations will keep working closely for the benefit of our people and for a better future for our planet.… pic.twitter.com/dDMun17fPq
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
पंतप्रधान मोदी जेव्हा राष्ट्रपती ट्रम्प यांना भेटतील तेव्हा नव्या अमेरिकन राष्ट्रपतींना भेटणारे ते जगातील तिसरे नेते असतील. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर एका महिन्याच्या आत भारत-अमेरिकेच्या उच्च नेत्यांची भेट ही दोन्ही देशांदरम्यानचे वाढते संबंध दर्शवते.