Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai News : वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Mumbai News : वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबई  : बदलापूर येथील वर्तमानपत्र विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाईचे उदाहरण ताजे असतानाच दादर येथील महिला असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टालवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे ही महिला वृत्तपत्र वितरण करण्यासाठी गेली असता तिच्या अपरोक्ष ही कारवाई झाली आहे.

श्रीमती सविता कुंभार असे या महिलेचे नाव असून गेली सुमारे ४० वर्षांपासून ह्या व्यवसायात आहेत. त्यानंतर लगेच महानगपालिकेचे आयुक्तांचे स्थळ भेटीचे कारण सांगून सायन येथील वर्तमानपत्र विक्रेते सुनील लेणार यांच्याही वर्तमानपत्राच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे वर्तमानपत्र विक्रेत्यांना फेरीवाला सुचीतून वगळण्यात आले आहे; परंतु फेरीवाल्यांसोबत सरसकट या वर्तमानपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे सगळेच विक्रेते जुने असून जास्तीत जास्त स्थानिक आहेत.

Mumbai News : जिल्हा ग्रंथालय मुंबई उपनगरच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सदर कारवाईमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संपूर्ण वृतपत्र विक्रेत्यांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईमधून विक्रेत्यांना वगळण्यासाठी दिलेल्या आदेशाला हरताळ फासला आहे. याशिवाय महापालिका आयुक्तांनीही वृतपत्र विक्रेत्यांना कारवाईतून वागळण्यासाठी अनेक वेळा परिपत्रके काढली असून स्थानिक प्रशासनाने या परिपत्रकानाही जुमानले नाही.

विक्रेता समाजातील गरीब, कष्टकरी असून कोरोनानंतर मुले मिळत नसल्यामुळे त्यांना अगोदरच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास वाढला आहे. वसुलीचा त्रास आहे सूट्टी नाहीच असे असतानाही कष्टाळू वर्तमानपत्र विक्रेत्यांवरच कारवाई करुन काय साध्य करावयाचे आहे? असा प्रश्न संघर्ष
उपस्थित केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -