Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीलाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची आश्वासनपर ग्वाही

लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची आश्वासनपर ग्वाही

लाडकी बहीण अपात्र योजनेसाठी निराधार योजनेतून मदत देणार

मुंबई (प्रतिनिधी) : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच” ही योजना कधीही बंद पडणार नाही। अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी ladkiयेथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रम या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली.

मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. “भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कस चालवायचं, याचा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता विचार करतोय, असे आश्वासन दिले. या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती,तर जीवनभर लक्षात राहणारा असा अनुभव होता. आम्ही कधी विमान पाहिले नव्हते, त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

Mumbai Tech Week 2025 : आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शासन पातळीवर या मागणीचा विचार करू, असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले होते. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करम्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -