Sunday, March 16, 2025
Homeकोकणरायगडजिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची राज्याबाहेर अविष्कार भरारी

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची राज्याबाहेर अविष्कार भरारी

डॉ. भरत बास्टेवाड यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद, केंद्रीय प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा २०२४/२५ राष्ट्रीय अविष्कार अभियान राज्याबाहेर शैक्षणिक अभ्यास सहलीचे मध्य प्रदेश, भोपाळ येथील प्रादेशिक विज्ञान भवन येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सहा शाळांची निवड करण्यात आली होती. या शाळांमधील ४५ विद्यार्थी सहलीत सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहल पार पडली.

राष्ट्रीय अविष्कार अभियान राज्याबाहेर शैक्षणिक अभ्यास सहलीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम व विभागात द्वितीय पुरस्कार प्राप्त रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव खालापुरचे आठ विद्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा तळोदे पाचनंद पनवेलचे चार विद्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा, खारपाडा पेणचे सहा विद्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा, खोपटे उरणचे आठ विद्यार्थी, विर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर माथेरानचे १३ विद्यार्थी, शासकीय आश्रम शाळा पिंगळस कर्जतचे सहा विद्यार्थी असे एकूण ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांची या सहलीसाठी नोडल अधिकारी म्हणून, तर पेणच्या सुषमा धुर्वे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती. त्यांच्यासोबत संतोष चाटसे, नंदिनी कदम, विभावरी सिंगासने, अमृता तोडकर, सिमा डोंगरे यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली होती.

दरम्यान, सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रादेशिक विज्ञान केंद्र, भोपाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, आदिवासी जनजाती म्युझियम, वनविहार प्राणी संग्रहालय, नौकानयन, राजा भोज तलाव, जगप्रसिद्ध ताज उल मस्जिद, मोती मस्जिद, कर्करेषा, सांची स्तूप, पीपल्स मॉल व भीमबेटका इतक्या स्थळांची भेट व अभ्यास करण्याची संधी मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -