
लातूर : राज्यातल्या बोगस अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई करण्यात येते. खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक शाळांना टाळे ठोकले आहे. दरम्यान, लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खासगी शाळेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेने लातूरमधील 'नारायण ई-टेक्नो' शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आले आहे. (Latur School)

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे ...
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील अंबाजोगाई रोडवर नारायण ई-टेक्नो शाळा मागील एक वर्षांपासून मान्यता नसताना सुरू होती. वारंवार नोटीस पाठवली, पण फरक पडला नाही. त्यामुळे दंड ठोठावत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शाळेला जिल्हा परिषदेकडून तब्बल १९ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोकत कुलूप ठोकण्यात आले आहे.
दरम्यान, या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जवळपास ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याचे अनधिकृतपणे अॅडमिशन करून घेण्यात आले आहे. मात्र मागच्या १ वर्षापासून ही शाळा शासनाच्या कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्यामुळे ही शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे असणार आहे. (Latur School)