Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रश्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कुस्त्यांची दंगल

श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कुस्त्यांची दंगल

पहिल्याच दिवशी २५१ कुस्त्या; दोन दिवसांत लाखोंची उलाढाल

कळवण : श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून हजारो विठ्ठलभक्तांनी मंदीरात विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजा करुन सुखसमृध्दीचे साकडे घातले. कुस्ती दंगलीच्या पहिल्या दिवशी कै. राजाराम पगार कुस्ती आखाड्यात लहान – मोठ्या २५२ कुस्त्या प्रेक्षणीय व रंगतदार झाल्या.

स्व. नथू यशवंत पगार स्मरणार्थ अर्जुन पगार यांच्याकडून पहिल्या दिवसाची २१ हजाराची मानाची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. पहिल्या दिवसाच्या कुस्ती दंगल आखाड्याचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते नगराध्यक्ष कौतिक पगार,कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार , पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ,अँड परशुराम पगार, सुधाकर पगार, भाऊराव पगार,प्रा.के.के.शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बागूल,अर्जुन पगार,जयेश पगार,गोरख बोरसे,चिंधा शिरसाठ, किशोर चव्हाण ,राजेंद्र पवार, निंबा पगार,जितेंद्र पगार नितीन पगार यात्रा महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय पगार, खजिनदार राजेंद्र पगार रविंद्र पगार आदी मान्यवराच्या उपस्थितीत झाले.

येवला ,मनमाड ,भगुर ,नाशिक ,पुणे ,कोपरगाव ,सातारा ,सांगली ,आदी ठिकाणच्या कुस्तीगिरांनी हजेरी लावली. रोख रकमेच्या तसेच आकर्षक भेट वस्तू देऊन कुस्त्या पार पडल्या. पंच म्हणून शामराव पगार,जितेंद्र पगार, नितीन पगार,अँड विनायक पगार सुरेश पगार,मोतीराम पगार , प्रदीप पगार,सचीन पगार, अमोल पगार,अमित पगार,संदीप पगार,मनिष पगार आदीनी कामगिरी बजावली.

यात्रा महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी उपाध्यक्ष साहेबराव पगार ,भाऊसाहेब पगार, रामकृष्ण पगार, हर्षल पगार, सूरज पगार, नंदकिशोर पगार,चेतन पगार,गोरख पाटील, किरण पगार,मोयोद्दीन शेख, वाडेकर यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -