

मुंबई : पायांमध्ये अशक्तपणा आल्यामुळे बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रूग्णालयात २३ जानेवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या एफ उत्तर विभागातील ५३ वर्षीय ...
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. आता राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजन आणि त्यांचे समर्थक उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला आगरकर मार्गावर एका सहकारी बँकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक घोटाळ्याची तयारी सुरू होती. पण सावध असलेल्या यंत्रणेने ...
राजन साळवी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून २००९ ते २०२४ या काळात आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव केला. याआधी राजन साळवी २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत राजापूरमधून विजयी झाले होते. आमदार असताना राजन साळवींनी महाविकास आघाडीकडून २०२२ मध्ये विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीच्या राहुल नार्वेकरांचा विजय झाला आणि साळवी पराभूत झाले होते.

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे ...
राजन साळवींची कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात ताकद आहे. यामुळे राजन साळवींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कोकणातील ताकद वाढण्यास मदत होईल. उद्धव ठाकरे गटाची राजकीय ताकद आणखी कमी होईल; अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे पहिल्यांदाच आमदार झालेल्या राज्यातील ७८ जणांचे दिल्लीत संसदीय कामकाज प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी कोकणात विनायक राऊत यांना जास्त महत्त्व दिले. यावरुन राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्यात मतभेद झाले. या मतभेदांमुळेच राजन साळवींनी उद्धव यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.