Tuesday, July 1, 2025

US उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांच्या मुलाच्या बर्थडेला पोहोचले पंतप्रधान मोदी, दिली खास भेट

US उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांच्या मुलाच्या बर्थडेला पोहोचले पंतप्रधान मोदी, दिली खास भेट

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पॅरिसमधील एआय अॅक्शन शिखर परिषदेदरम्यान अमेरिकन उपराष्ट्रपती जेडी वेन्स, त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा आणि त्यांच्या मुलांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी वेन्स कुटुंबासोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत.


यात पंतप्रधान मोदी वेन्स यांची मुले इवान आणि विवेकसोबत उभे आहेत. सोबतच पंतप्रधान मोदी वेन्स यांचा मुलगा विवेक यांच्या बर्थडेमध्येही सहभागी झाले. त्यांनी खास गिफ्चही दिलले. वेन्स यांनी पंतप्रधान मोदींना दयाळू असे म्हणत आभारही व्यक्त केले.


पंतप्रधानांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपतीच्या कुटुंबासोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट करताना म्हटले, अमेरिकन उपराष्ट्रपती जेडी वेन्स आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत अद्भुत बैठक झाली. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. त्यांचा मुलगा विवेकच्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन त्यांच्यासोबत केल्याने आनंद झाला.


 


तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी पंतप्रधान मोदींबाबत आभार व्यक्त करताना म्हटले, पंतप्रधान मोदी खूप दयाळू आहेत. आमच्या मुलांनी गिफ्टचा आनंद घेतला. या अद्भुत चर्चेसाठी मी त्यांचा आभारी आहे.


पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांची भेट शिखर परिषदेतील वेन्स यांच्या संबोधनानंतर लगेचच झाली. यात वेन्स यांनी एआयबाबत पंतप्रधान मोदींच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले.


 


वेन्स यांनी मानले मोदींचे आभार


वेन्स म्हणाले, मी पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचे कौतुक करतो. एआय लोकांना सुविधा प्रदान करेल आणि अधिक उत्पादक बनवेल. हे माणसांची जागा घेणार नाही.

Comments
Add Comment