मुंबई : एका कालावधीनंतर प्रत्येक ग्रह आपल्या राशीत परिवर्तन करतो. अशावेळी युतीचा प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर (Mahashivratri 2025)दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. या दिवशी तीन राशींमध्ये सहा ग्रह विराजमान होणार आहेत. यामुळे शुक्र आणि गुरु ग्रह एकत्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Latur School : विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात! लातूरमध्ये ‘या’ शाळेला ठोकले टाळे
त्याचबरोबर, बुध ग्रह मकर राशीत असणार आहे. या ठिकाणी सूर्य आणि शनीसुद्धा कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे चार राशीतील लोकांवर भगवान शिवची विशेष कृपा राहणार असून त्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
मेष रास
कुंभ राशीत तीन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे विशेष लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले काम देखील पूर्ण होईल.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा चांगला लाभ मिळेल. सूर्य, चंद्र आणि शनीच्या युतीने या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर रास
मकर राशीच्या दुसऱ्या चरणात युती होणार आहे. यामुळे या काळात तुम्हाला धन-संपत्तीची कोणतीच कमतरता भासणार नाही. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
कुंभ रास
या राशीच्या विवाह चरणात त्रिग्रही योग जुळून येणार आहे. या राशीच्या लोकांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल.