Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीमिशन रेबीज: मुंबईत सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण

मिशन रेबीज: मुंबईत सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण

मुंबई (खास प्रतिनिधी) – मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘मिशन रेबीज’ या संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी २८ सप्टेंबर २०२४ पासून सामूहिक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असून हा कार्यक्रम मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्राणी प्रेमी संस्थांच्या मदतीने आतापर्यंत सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.

प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमी वर हा जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये रेबीज लसीकरण तसेच प्रतिबंधासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी जनजागृतीपर संदेश देणाऱ्या चित्रफितींसह एलईडी वाहन तयार करण्यात आले असून या वाहनाद्वारे संपूर्ण मुंबईत जनजागृती करण्यात येणार आहे.

Nitesh Rane : एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबईतील नागरिकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वचनबद्ध आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने जनजागृती एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

दरम्यान, नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने एलईडी स्क्रिन आधारित वाहन तयार करण्यात आले आहे. याद्वारे माहितीपूर्ण संदेश प्रसारित करण्यात येतील. यामध्ये रेबीजचे धोके, लसीकरणाचे महत्व याविषयी माहिती, जबाबदार पाळीव प्राणी मालकी आणि प्राणी कल्याण प्रोत्साहन, रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आदी बाबींचा समावेश असेल. या वाहनाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) जनजागृती करण्यात येणार आहे. प्रामुख्याने उच्च जोखीम असलेला परिसर आणि दाट लोकवस्तीच्या परिसरांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही पठाण यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -