Sunday, May 11, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या महिन्यात पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ फेब्रुवारीला होईल तर फायनल सामना ९ मार्चला खेळवला जाईल. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. त्यात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता होती.


मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर आपला निर्णय दिला आहे. बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत दुखापत झाली होती.


त्याच्या जागी स्टार स्पिनर वरूण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, यशस्वीला नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट म्हणून ठेवण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराऊंडर शिवम दुबेलाही नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट म्हणून ठेवण्यात आले आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.


नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट- यशस्वी जायसवाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.


Comments
Add Comment