लासलगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ


लासलगाव : लासलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलिस स्टेशनची एपीआयची पोस्ट पीआयमध्ये दर्जोन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येथील पदेदेखील वाढणार आहेत. त्याचबरोबर पोलीस वसाहतीच्या प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, त्यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.


महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या.मुंबई यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या लासलगाव पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अधीक्षक अभियंता सपना कोळी, पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे, सहायक पोलिस निरिक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपणार, श्री.वाळके, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, सरपंच योगिता पाटील, रामनाथ शेजवळ, अनिता ब्रम्हेचा, मंगेश गवळी, धर्मेश जाधव, मच्छिंद्र थोरात, बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, अफजल शेख, शिवाजी सुपनर, संतोष राजोळे, पांडुरंग राऊत, कंत्राटदार प्रशांत सारडा, आर्किटेक्ट जयंत कोलते यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


यावेळी भुजबळ म्हणाले की, लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असल्याने याठिकाणी दिवसभर शेतकरी वर्गाची मोठी वर्दळ असते. तसेच मोठी आर्थिक उलाढाल याठिकाणी होत असते. त्यामुळे येथे कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी पोलिस यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक आहे. लासलगाव बसस्थानक, लासलगाव विंचुर रस्ता चौपदरीकरण, बाह्य वळण रस्ता, शिवनदीवरील पाटोदा रस्त्याला जोडणारा पूल, उपजिल्हा रुग्णालय बांधकाम यासह अनेक महत्वाची कामे आपण हाती घेतली आहेत. अप्पर तहसील कार्यालय तयार करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या काळात मंत्री असो किंवा नसो कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही. कल्याणराव पाटील, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अधीक्षक अभियंता सपना कोळी, ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Comments
Add Comment

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा

पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट