महापालिका विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी येणार पाच कोटी खर्च

किड्झानिया पार्कसाठी प्रत्येक विद्यार्थी ७०० रुपये, तर राणीबागेत ६३० कोटी रुपये खर्च


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापलिका शाळांमधील मुलांची यंदाही भायखळा राणीबाग आणि घाटकोपर येथील किडझानिया पार्कमध्ये नियोजित असून या किडझानिया पार्कसाठी विद्यार्थ्यांमागे प्रत्येकी ७०० रुपये, तर राणीबागेतील सहलीसाठी प्रत्येकी ६३० रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे राणीबागेची जागा महापालिकेची असूनही त्याठिकाणी महापालिका प्रत्येकी ६३० रुपये मोजणार आहे, महापालिका शाळांमधील इयत्ता ४थी विद्यार्थ्यांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आणि इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घाटकोपर 'किड्झानिया थीम पार्क, येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.



महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिका शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. महापालिकेतील शालेय मुलांची सहल राणीबागेत आयोजित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असून त्यानुसार मागील काही वर्षांपासून इयत्ता चौथीच्या मुलांना राणीबागेत सहलीसाठी नेले जाते. विमानात प्रवास करताना कशा प्रकारे वागले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची पूर्तता व आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार कसे करायचे, बिस्कोटे अथवा आईस्क्रीम कसे करावयाचे. आग लागल्यास फायर ब्रिग्रेड कार्य कसे करते अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळतात. त्यामुळे इयत्ता सातवीतील शालेय मुलांची सहल किडझानिया येथ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


१५ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) एकदिवसीय सहलींचे आयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून शाळांकडून वेळापत्रक बनवण्यात आले आहे. यासाठी राणीबागेतील सहलीची जबाबदारी श्रीपांश एंटरप्रायझेस या कंपनीवर सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

माजी महापौर आणि माजी उपमहापौरांनी गड राखले

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार महापौर आणि तीन उपमहापौर निवडणूक रिंगणात