फ्रान्सला पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचं विमान होतं पाकिस्तानच्या हद्दीत 

लाहोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरिस भेटीदरम्यान त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला. 'इंडिया १' या विमानाने मोदी पॅरिस दौऱ्यावर गेले.हे विमान शेखुपुरा, हाफिजाबाद, चकवाल आणि कोहट भागातून पाकिस्तानात घुसले आणि सुमारे ४६ मिनिटे पाकिस्तानी सीमेत राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची हवाई हद्दी बंद झाल्यामुळे भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी देण्यात आली. नरेंद्र मोदींच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये, मोदींच्या विमानाने पोलंड ते दिल्ली प्रवासादरम्यान पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला होता. त्यावेळी विमान रात्री ११ वाजता पाकिस्तानी हद्दीत घुसले आणि ४६ मिनिटे तिथेच राहिले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी एआय समिटला उपस्थित राहिले, या ठिकाणी विविध देशांचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या