लाहोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरिस भेटीदरम्यान त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला. ‘इंडिया १’ या विमानाने मोदी पॅरिस दौऱ्यावर गेले.हे विमान शेखुपुरा, हाफिजाबाद, चकवाल आणि कोहट भागातून पाकिस्तानात घुसले आणि सुमारे ४६ मिनिटे पाकिस्तानी सीमेत राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची हवाई हद्दी बंद झाल्यामुळे भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी देण्यात आली. नरेंद्र मोदींच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये, मोदींच्या विमानाने पोलंड ते दिल्ली प्रवासादरम्यान पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला होता. त्यावेळी विमान रात्री ११ वाजता पाकिस्तानी हद्दीत घुसले आणि ४६ मिनिटे तिथेच राहिले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी एआय समिटला उपस्थित राहिले, या ठिकाणी विविध देशांचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.