Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMobile Bathroom : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार महिलांसाठी अनोखी बस!

Mobile Bathroom : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार महिलांसाठी अनोखी बस!

मुंबई : महिलांसाठी आनंदाची बातमी. आता झोपडपट्टीतील महिलांना रस्त्यावर आंघोळ करावी लागणार नाही. या समस्येचं निरसन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या व्यवस्थेमुळे सुरक्षित, सुखकारक वातावरणात महिलांना आंघोळ करता येईल. यासाठी महापालिकेने फिरते स्नानगृह नावाची विशेष बस सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील कांदिवली परिसरात या बसचे उद्घाटन करण्यात आले आहे.

GBS बाधित रुग्णाच्या मृत्यूबाबत काय म्हणाली BMC ?

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कांदिवली येथे महिलांसाठीच्या मोफत मोबाईल बाथरूम हाय टेक बसचे उद्घाटन करण्यात आले आहे. या बाथरूममध्ये महिलांना मोफत आंघोळ करण्यात येणार आहे. तसेच यामुळे पाण्याची बचत देखील होणार असल्याचे म्हटले जात आहे. जिल्हा नियोजन समिती आणि महानगरपालिकेने ही संकल्पना राबवली असून याचा फायदा गोरगरीबांना, झोपडपट्टीमध्ये तसेच रस्त्यावर राहणाऱ्या महिलांनाही होणार आहे. बसचे व्यवस्थापन तीन बहिणी करत आहे. या तिघी बहिणी ‘बी द चेंज’ नावाची संस्था चालवत आहे. शहाराच्या इतर भागातही अशा हायटेक मोफत मोबाईल बाथरूम आणण्याची तयारी सुरू आहे.

बसमध्ये कोणत्या सोयी उपलब्ध आहेत ?

बसमध्ये पाच बाथरूम आहेत. हँडवॉश, शॅम्पु, टब, बॉडी वॉश, टॉवेल, गीझर तसेच मोबाईल चार्जिंगची देखील सुविधा उपलब्ध आहे. या बसमध्ये कपडे सुकवण्यासाठी ड्रायर देखील आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ ते १० मिनिटे वेळ देण्यात येतील. बसमधील बाथरुमचे पाणी १० मिनिटानंतर आपोआप बंद होईल. बाथरुममधल्या टाकीची पाण्याची क्षमता २१०० लिटर इतकी आहे. बाथरुममध्ये बेसिन आणि इतर आवश्यक सुविधादेखील आहेत. महिलांकडून पालिकेच्या विशेष बससेवेचे स्वागत होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -