नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यावरल सोमवारी फ्रान्सला पोहोचले. येथे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांच्यासह एआय अॅक्शन समिटमध्ये सह अध्यक्षता करणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही करतील.
मोदींनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या आगमनाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांनी म्हटले की थोड्याच वेळापूर्वी पॅरिसमध्ये पोहोचलो आहे. येथे एआय, औद्योगिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमांची प्रतीक्षा करत आहे.
Delighted to meet my friend, President Macron in Paris. @EmmanuelMacron pic.twitter.com/ZxyziqUHGn
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
पंतप्रधान हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तेथील भारतीयांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले की, पॅरिसमध्ये अविस्मरणीय स्वागत! थंडीचा कडाका असतानाही भारतीयांनी आज संध्याकाळी माझ्याबद्दलचे प्रेम दाखवले. त्याच्यासाठी मी आभारी आहे.
Je viens d’atterrir à Paris. Je suis impatient d’y participer à différents événements dédiés à des secteurs d’avenir comme l’IA, la technologie et l’innovation. pic.twitter.com/hrR6xJu7o8
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या सशस्त्र दल मंत्री सेबलेकोर्नू यांनी विमानतळावर अतिशय आपुलकीने स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांचा अधिकृत अमेरिका दौरा १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी असेल.डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. हा दौरा दोन्ही देशांच्या संबंधांच्या यशाला आणखी पुढे नेण्याची संधी असल्याचं मोदींनी म्हटलंय. दौऱ्यावर रवाना होण्याआधी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या दौऱ्यामुळे व्यापार, उद्योग, संरक्षण, उर्जा आणि पुरवठा साखळीची लवचिकता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात अमेरिकेसोबत भारताची भागिदारी वाढवण्यासाठी आणि सबंध दृढ करण्यास अजेंडा विकसित करण्यासाठीही मदत मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.