Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Turbhe Fire : तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग!

Turbhe Fire : तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग!

नवी मुंबई : आज सकाळच्या सुमारास मुंबईतील अंधेरी भागात आग लागल्याची घटना घडली होती. ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला  १० ते १२ सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे समोर आले होते. मुंबईतील आगीचे प्रकरण ज्वलंत असताना आता नवी मुंबईत आगीची घटना (Turbhe Fire) घडली आहे.

नवी मुंबईतील तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घडली आहे. तुर्भेमधील हनुमान नगरच्या मागे असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आग लागल्याचे कारण अद्यापही समोर आले नाही. (Turbhe Fire)

Comments
Add Comment