
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबई : राज्यात राजकारणाचे फासे कधी पालटतील याचा काही नेम नाही. काल ( दि १० ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या ...
जोगेश्वरी येथील ओशिवरा परिसरात असलेल्या लाकडाच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली आहे. १० ते १२ सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या दुकानांना लागली असून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी या घटनेबाबत अधिकचे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरु आहे.