Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीPolitical News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आमनेसामने

Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आमनेसामने

मुंबई : राज्यात राजकारणाचे फासे कधी पालटतील याचा काही नेम नाही. काल ( दि १० ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमागे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे धागेदोरे जोडले असल्याचे बोलले जात होते. राज्याच्या राजकारणात सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू असताना दिल्लीत मोठी घडामोड होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकाच मंचावर येणार असल्याची बातमी समोर आली आहे.

BMC News : ‘या’ सहा हजार फेरीवाल्यांचे काय होणार?

सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

GBS : पुण्यात जीबीएसचा वाढता फैलाव!

दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात ११ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आजारपणामुळे राजकारणापासून, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आजारपणामुळे राजकारणापासून मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत एकत्र दिसणार असल्याने या पुरस्कार वितरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -