Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mahakumbh Accident : काळाचा घाला! कुंभमेळ्याहून परतताना बसची ट्रकला जोरदार धडक

Mahakumbh Accident : काळाचा घाला! कुंभमेळ्याहून परतताना बसची ट्रकला जोरदार धडक

७ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी


जबलपूर : महाकुंभमेळ्याहून परतताना भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक (Mahakumbh Accident) झाली. या धडकेत बसचा चक्काचूर झाला असून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३०वर हा अपघात झाला. कुंभमेळ्याहून परतलेल्या भाविकांची बस बर्गी गावादरम्यान पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले असून ताताडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. तर बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सिमेंटने भरलेला एक ट्रक विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये बसच्या काही भागाचे तुकडे झाल्याचे दिसत आहे. तसेच स्थानिक लोक ट्रकच्या छतावर चढून प्रवांशाची मदत करत आहेत. घटनास्थळी क्रेन देखील पोहोचली आहे. या अपघातात आणखी कुणी बसमध्ये अडकले आहेत का? याचा तपास सुरू आहे.


Comments
Add Comment