Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखबांगलादेशी घुसखोर; मुंबईची चिंता...

बांगलादेशी घुसखोर; मुंबईची चिंता…

मुंबईत अभिनेता सैफ अली खानच्या निवासस्थानी हल्ला करणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी घुसखोर होता हे आता सिद्ध झालेलेच आहे, याच बांगलादेशींच्या मुद्द्यांवरून कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे नेहमीच आवाज उठवत असतात. बांगलादेशी घुसखोरी हा गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी गंभीर धोका ठरलेला आहे. ही समस्या केवळ आसाम राज्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशात पसरलेली आहे. महाराष्ट्र, पुणे, मुंबई, संभाजीनगर, भिवंडी, मालेगाव यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर आढळतात. सरकारी भ्रष्टाचारामुळे या घुसखोरांना सहजपणे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि इतर ओळखपत्रे मिळतात, त्यामुळे ते भारतात कायदेशीर नागरिक असल्याचे भासवतात. या घुसखोरांमुळे देशाच्या लोकसंख्येच्या रचनेत असंतुलन निर्माण होत आहे.

अल्पेश म्हात्रे

बांगलादेशी घुसखोरांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अनेक राज्यांमध्ये, विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये, दंगली आणि बॉम्बस्फोटांसाठी बांगलादेशी घुसखोर जबाबदार असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. अंदाजे १० कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर भारतात अवैधरीत्या राहतात आणि भविष्यात हेच घुसखोर मोठ्या संकटास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. विविध दंगली, बॉम्बस्फोट आणि समाजविघातक कृत्यांमध्ये त्यांचा हातभार असतो. अनेकदा दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घुसखोरांनी देशातील रोजगारांच्या संधी हिरावून घेतल्या आहेत. बांधकाम क्षेत्र, मजुरी, तसेच विविध व्यवसायांमध्ये ते कमी दरात काम करतात, त्यामुळे भारतीय नागरिक बेरोजगार होत आहेत. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ८ ते १० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. बांगलादेशी घुसखोरांनी नागपूरसारख्या ठिकाणी ४०० एकरहून अधिक जमिनीवर अनधिकृत वसाहती उभारल्या आहेत. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागांतील जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. देशातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग दिसून येतो.

मुंबई, पुणे, बंगाल आणि आसाममध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. आसामचे तत्कालीन राज्यपाल जनरल सिन्हा यांनी १९९८ मध्ये राष्ट्रपतींना घुसखोरीचा अहवाल सादर केला, परंतु त्यावर कोणतीही ठोस कृती झाली नाही. आजही सरकारकडून बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुरेशी कठोर पावले उचलली जात नाहीत. अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये घुसखोरीसाठी कडक शिक्षा आणि तुरुंगवास असतो. इस्रायलसारखे देश घुसखोरीला राष्ट्रीय सुरक्षेचा धोका मानून कठोर कारवाई करतात. भारतामध्ये मात्र उलट चित्र आहे. येथे घुसखोरांना आधारकार्ड, रेशनकार्ड मिळते आणि काही वेळा ते निवडणूक लढवण्याच्या स्थितीत येतात! आता सनातन, हिंदू जनजागृती समिती सारख्या संस्थांनी सुद्धा या घुसखोरांविरोधात आता मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील धनवट यांनी पत्रकार परिषदेद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे आणि राज्य सरकारांनी ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवून देशभरातील घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना ओळखपत्र तपासणीच्या आधारे हाकलून लावले पाहिजे. अशी जोरदार मागणी लावून धरत आहेत. आता जनतेने सुद्धा आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई मानून स्वतः जागरूक राहिले पाहिजे.

बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा शोध घेऊन कठोर शिक्षा द्यावी, संशयित भागांमध्ये ‘सर्च ऑपरेशन’ / ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून घुसखोरांना शोधणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांविषयीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि माहिती देणाऱ्या नागरिकांची गुप्तता राखली जावी. घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली पाहिजे. संशयित व्यक्तींविषयी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. पंतप्रधान मोदी सरकारने सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांची अंमलबजावणी त्वरित करावी. या कायद्यांद्वारे घुसखोरांना ओळखून देशाबाहेर पाठवता येऊ शकते, तर केवळ सरकार आणि सुरक्षा दलांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. सर्वसामान्य नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.

नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे आणि संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना कळवाव्यात. बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या लोकांवरही कठोर कारवाई केली पाहिजे. प्रत्येकाने घुसखोरांविरोधात आवाज उठवून सरकारवर दबाव आणला पाहिजे, जेणेकरून कठोर कारवाई होईल. बांगलादेशी घुसखोरी हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. हे घुसखोर केवळ दहशतवाद आणि गुन्हेगारी वाढवत नाहीत, तर भारतीय नागरिकांचे रोजगारही हिसकावून घेत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेची एकजूट आवश्यक आहे. सरकारने कठोर कायदे करून आणि प्रभावी अंमलबजावणी करत या समस्येवर कायमचा उपाय शोधला पाहिजे. आज निष्क्रिय राहिलो, तर उद्या हीच समस्या आपल्याला विनाशाच्या उंबरठ्यावर नेईल. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन ठोस कृती करणे गरजेचे आहे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -