Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीBeer Price Hike : तळीरामांची पार्टी महागली! बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ

Beer Price Hike : तळीरामांची पार्टी महागली! बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : दारूचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण तरीही लोक नशा करण्यासाठी ते पितात. मात्र तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तेलंगणा हे दक्षिण भारतातील बिअरच्या सेवनासाठी सर्वात महागडे राज्य बनले आहे. परंतु तेलंगणातील बिअरप्रेमींना सरकारने (Telangana Govrnment) मोठा झटका दिला आहे. तेलंगणामध्ये बिअरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता बिअरसाठी अधिकचे पैसे खर्च (Beer Price Hike) करावे लागणार आहेत.

Turbhe Fire : तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग!

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निर्देशात तेलंगणाचे प्रधान सचिव (महसूल) एस.ए.एम रिझवी यांनी तेलंगणा बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना किंमत समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले. निवृत्त न्यायमूर्ती जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने बिअरच्या किमतीत १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्याला मंजुरी दिल्यानंतर सरकारने सुधारित बीअर एमआरपी मंगळवारपासून लागू केली आहे.

त्यानुसार, राज्यात बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढल्याने नियमित ६५० मिली बिअरच्या बाटलीची किंमत ब्रँडनुसार १७०-१८० रुपये असण्याची शक्यता आहे. सुधारित किंमती सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत येतात, ज्याचा उद्देश मद्यविक्रीतून महसूल वाढवण्याचा आहे. (Beer Price Hike)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -