Thursday, May 8, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

CM Devendra Fadnavis And Raj Thackeray : फडणवीसांच्या 'शिवतीर्थ'वरील भेटीचं 'राज' काय ?

CM Devendra Fadnavis And Raj Thackeray : फडणवीसांच्या 'शिवतीर्थ'वरील भेटीचं 'राज' काय ?

मुंबई : आठवड्याची सुरुवात मुंबईतल्या एका मोठ्या राजकीय घटनाक्रमाने झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईत राज यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर ही भेट झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतरची देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ बंगल्यावर झालेली ही पहिली भेट आहे. सकाळी साडेऊनच्या सुमारास ही भेट झाली. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि राज यांची भेट झाली त्यावेळी मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.


/>

भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती मिळालेली नाही. पण अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याबाबत किंवा महापालिकेच्या राजकारणाच्यादृष्टीने फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाशी संबंधित एक कार्यक्रम मुंबईत शिवाजी पार्क येथे होणार होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या थोडा वेळ आधी मुख्यमंत्र्‍यांनी राज यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री नियोजीत कार्यक्रमासाठी गेले होते.

Comments
Add Comment