Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीबुरख्याच्या आत दडलंय काय?

बुरख्याच्या आत दडलंय काय?

सोन्याची तस्करी करणा-या चारही महिलांना अटक!

मुंबई : बुरख्याच्या आत काय आहे? या एका प्रश्नाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ माजली. विमानतळावरच्या सुरक्षा यंत्रणांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली असून, बुरख्याच्या आड सोन्याची तस्करी करणाऱ्या चार केनियन महिलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, डीआरआय (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिक तपास करत आहे.

बुरख्याच्या आत सोन्याचा साठा

नैरोबीहून आलेल्या चार महिलांवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आला. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न करता त्या कस्टमच्या ग्रीन चॅनलपर्यंत पोहोचेपर्यंत नजर ठेवली. महिलांनी मेटल डिटेक्टरमधून जाताच, अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर संशयाचे भाव उमटले.

महिला अधिकाऱ्यांनी विचारले, “बुरख्याच्या आत काय आहे?” तेव्हा चारही महिलांचे चेहरे फिके झाले. त्यांनी काहीही उत्तर न देता काही नाही असे म्हणत फक्त मान हलवली.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा; मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

५ किलोहून अधिक सोनं जप्त!

त्यानंतर महिलांना इन्व्हेस्टिगेशन रूममध्ये नेऊन तपासणी करण्यात आली आणि धक्कादायक सत्य उघड झाले. त्यांच्या बुरख्याच्या आत सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या विटा लपवण्यात आल्या होत्या.

🔸 जप्त केलेलं सोनं: ५.१८५ किलो
🔸 एकूण बाजारमूल्य: ४.१४ कोटी रुपये

या कारवाईनंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, या चारही महिला नैरोबीच्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश?

मुंबई विमानतळावर अशा प्रकारची सोन्याची तस्करी यापूर्वीही उघड झाली आहे. मात्र, यावेळी गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हा कट उघडकीस आणला. ही केनियन टोळी मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करत आहे का? याचा तपास आता सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -