कल्याण (प्रतिनिधी) : थंडीचा महिना सुरू झाला की रायगड-अलिबागमध्ये सुरू होते धूम ‘पोपटीच्या सिजनची’. थंडीत पोपटी म्हणजे खव्वयांची पहिली पसंती. घरातली मंडळी असो वा मित्रमंडळी रात्रीचा वेळ राखून गप्पांच्या रंगतीत शेकोटी पेटवून मडक्यात ठराविक साहित्य गोळा करून मिश्रण बनवले जाते आणि अचुक अंदाजात मडके शेकोटीतून बाजूला केले जाते; परंतु शहरी भागात जागेअभावी खव्वयांना पोपटी बनविणे शक्य होत नाही याच आनुषंगाने दर्यादारी हॉटेलच्या माध्यमातून ठाण्यात येत्या १४ ते १६ फेब्रुवारीपर्यंत ‘पोपटी फेस्टिवलचे’ आजोयन करण्यात आले आहे.
पोपटी बनवण्यापूर्वी सर्व साहित्य जमवून ठेवणे आवश्यक आहे. सर्व प्रथम मोठ्या मडक्यामध्ये तळाला औषधी वनस्पती म्हणून प्रचलीत असणाऱ्या मारबेटीचा पाल्याचा थर लावावा लागतो जो केवळ थंडीच्या महिन्यातच उपलब्ध असो, दर्यादारीत पोपटी फेस्टिवलमध्ये प्रत्येकी मडक्यात १ किलो चिकन, कोलबी, अंडी, तुरी-वाल्याच्या शेंगा अशा पद्धतीची पारंपरिक आगरी मसाल्यातील मेजवाणी असणार आहे. विशेष म्हणजे पोपटी बनविताना तेल-पाणी वापरले जात नसुन ‘हेल्दीफुड’ खाणाऱ्यांसाठी हा पदार्थ आरोग्यदायी ठरू शकतो. थंडी सरता सरता ह्या सिजनमध्ये ठाणेकरांना अन् इतर खवय्यांना पोपटीचा अनुभव घेण्यासाठी ह्या फेस्टिवलमध्ये आगामी नोंदणी आवश्यक असणार आहे असे आयोजक सर्वेश तरे यांनी सांगीतले आहे.
मागच्या पोपटी फेस्टिवलमध्ये दिग्दर्शक विजू माने, लोककवी अरुण म्हात्रे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर या मान्यवरांनी भेट देऊन पोपटीचा आवर्जून आस्वाद घेतला होता अन् यंदाही अनेक मान्यवरांची