नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधानांचा हा दौरा १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान आहे. फ्रान्समध्ये ते एआय संदर्भातल्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेचे पंतप्रधान मोदी हे सहअध्यक्ष असतील.
पंतप्रधान मोदी आज आणि उद्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील.यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील. या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय थर्मोन्युक्लिअर प्रायोगिक रिएक्टर योजनेचा दौरा करण्यासाठी मार्सिलेला जाणार आहेत. फ्रान्सनंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जातील.
फ्रान्स दौऱ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तिथे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून फ्रान्सचा दौरा करत आहे. एआय संदर्भातल्या शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी उत्सुक आहे. सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह, सर्वांच्या भल्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या सहकार्यात्मक दृष्टीकोनाच्या विचारांचं आदान प्रदान करू; असे मोदी म्हणाले.
In Washington DC, I look forward to meeting @POTUS @realDonaldTrump. This visit will further cement India-USA friendship and boost ties in diverse sectors. I warmly recall working with President Trump during his first term and I am sure our talks will build on the ground covered…
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
पंतप्रधान मोदी यांचा अधिकृत अमेरिका दौरा १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी असेल.डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. हा दौरा दोन्ही देशांच्या संबंधांच्या यशाला आणखी पुढे नेण्याची संधी असल्याचं मोदींनी म्हटलंय. दौऱ्यावर रवाना होण्याआधी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या दौऱ्यामुळे व्यापार, उद्योग, संरक्षण, उर्जा आणि पुरवठा साखळीची लवचिकता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात अमेरिकेसोबत भारताची भागिदारी वाढवण्यासाठी आणि सबंध दृढ करण्यास अजेंडा विकसित करण्यासाठीही मदत मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याबद्दल बोलताना म्हटलं की, आम्ही दोन्ही देशांच्या लोकांच्या हितासाठी मिळून काम करू आणि जगासाठी चांगल्या भविष्याला आकार देऊ. मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि अमेरिकेा यांच्यात व्यापक जागतिक धोरणात्मक भागिदारीसाठी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काम केल्याच्या चांगल्या आठवणी माझ्याकडे आहेत.