Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीतुमचे Bank Of Barodaमध्ये खाते आहे का? तर ही बातमी तुमच्या कामाची

तुमचे Bank Of Barodaमध्ये खाते आहे का? तर ही बातमी तुमच्या कामाची

मुंबई : भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सऐप बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिक आणि वाचक ग्राहकांना आता व्हॉट्सऐप बँकिंगच्या मराठी आवृत्ती द्वारे निवडक बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार.

मराठी च्या अगोदर ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत पण उपलब्ध आहे. बँकेचे विद्यमान किंवा इतर ग्राहक, त्यांच्या मोबाईल नंबर वरून “hi” टाइप करून आणि ८४३३८८८७७७ वर संदेश पाठवून या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर, ग्राहक ‘प्रोफाइल’ मध्ये जाऊन ‘भाषा’ पर्याय निवडून उपलब्ध भाषा पर्यायांमधून त्यांच्या पसंतीची भाषा निवडू शकतात. बँक लवकरच इतर भारतीय भाषांमध्ये व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करीत आहे.

वेळेचे व्यवस्थापन शिका; अभ्यास न करण्याची सबब सांगू नका

बँकेचे विद्यमान ग्राहक खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट आणि चेक बुक करिता निवेदन, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, कर्जाचे स्टेटमेंट इत्यादी इतर तत्काळ सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना त्यांच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने विविध डिजिटल चॅनेलद्वारे भारतीय भाषा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सतत प्रयत्नशील आहेत, हे उल्लेखनीय आहे.

भारतातील विविध भाषिक समुदायाच्या ग्राहकांना त्यांच्या भाषेत बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी बँक पूर्णपुणे वचनबद्धतेने काम करीत आहे आणि बँकेच्या डिजिटल लेंडिंग पोर्टलमध्ये हिंदी आणि इंग्रजीसह १३ भाषांमध्ये मोबाइल बँकिंग आणि व्यवहार संबंधित एसएमएस, ९ भाषांमध्ये एटीएम इंटरफेस, बीओबी वर्ल्ड इंटरनेट बँकिंग मध्ये हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे. बँकेच्या या धोरणाचा उद्देश सामान्य ग्राहकांना त्यांच्या सोयीस्कर भाषेत सेवा उपलब्ध करून त्यांच्याशी संबंध दृढ करणे आणि पारदर्शिक बँकिंग तत्त्वाचे पालन करून अधिकाधिक लोकांना बँकिंगच्या कार्यक्षेत्रात आणणे अस आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -