Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Daryapur : दर्यापुरात 'उबाठा'च्या ७५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Daryapur : दर्यापुरात 'उबाठा'च्या ७५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना, युवासेना, सहकार सेना आदी आघाड्यांतील पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा दर्यापूर मतदारसंघात आमदार निवडून आल्यानंतर या पक्षाचा विधानसभा क्षेत्रात चांगला बोलबाला निर्माण झाला होता. मात्र सामूहिक राजीनामे दिल्याचे जाहीर केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून विविध चर्चाना उधाण आले आहे. शिवसेनेचे आमदार गजानन लवटे हे एकनिष्ठ जुन्या जाणत्या कार्यकत्यांना विश्वासात घेत नसून दुफळी निर्माण करत आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेतून नाराज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



दर्यापूर मतदारसंघात पक्षांतर्गत कार्यकारिणी व नवीन तालुका प्रमुख निवडताना जुन्या कार्यकत्यांना विश्वासात घेतले नसल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांची मने दुखावली असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या ७५ जणांनी राजीनामे दिल्यानंतर हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्या पक्षात जाणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभेत इमाने इतबारे पक्षाचे काम केले पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रसंगी घरावरही तुळशीपत्र ठेवणारे आमचे कार्यकर्ते नवनिर्वाचित आमदारांच्या वर्तणुकीने दुखी झाले आहेत. पक्षाला मोठे करण्यासाठी तसेच निवडणुकीत आम्ही दिवस रात्र काम केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमची एकनिष्ठता कायम आहे. मात्र, आम्ही सर्वच पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत असल्याच्या प्रतिक्रिया सहकार सेनेचे तालुका प्रमुख गणेशराव लाजूरकर, तालुका समन्वयक सतीश काळे, तालुका सरचिटणीस जमील पटेल यांनी दिल्यात.


एकाही पदाधिकाऱ्याला पक्षातून काढले नाही जूतन कार्यकारिणी घोषित करणे हे माझे काम नाही. पक्ष संघटनेतील कार्यकारिणी घोषित करताना जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून कार्यकारिणी निवडली जाते. मी कोणत्याही कार्यकत्र्याला व पदाधिकाऱ्याला पक्षातून काढले नाही व काढणारही नाही. मी स्वतः अगोदर शिवसैनिक आहे नंतर आमदार. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकत्यांचा माझ्यावर नाराजीचा कुठलाही संबंध येत नाही. आ. गजानन लवटे, दर्यापूर विधानसभा.

Comments
Add Comment