साप्ताहिक राशिभविष्य, २ ते ८ फेब्रुवारी २०२५
![]() |
कार्य गतिशील होतीलमेष : सदरील सप्ताहात आपण अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. रोजची नियोजित कामे सहज होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. पूर्वी केलेले नियोजन सफल झालेले अनुभवता येईल. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. उत्साहाने आपल्या पुढील कामे आपण पूर्ण करू शकाल. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी हा कालावधी उत्तम राहील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली जमीन-जुमला तसेच काही संपत्तीविषयी असलेली कार्य गतिशील होतील. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. सरकारी स्वरूपाची कामे विनाविलंब होतील. |
![]() |
आपल्या कार्याचे कौतुक होईलवृषभ : समाजातील परिचित, अपरिचित, प्रतिष्ठित लोकांपासून लाभ मिळेल. त्यांच्या सहवासातसह मार्गदर्शन मिळेल. वेळप्रसंगी मदतही मिळू शकते. एखाद्या समारंभात मानाचे स्थान मिळू शकेल. सामाजिक कार्यातील रस वाढेल. हाती घेतलेली बहुतेक कामे यशस्वी होतील. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी तसेच हाताखालील लोकांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी ठराल. इतरांना मार्गदर्शन करू शकाल. आपल्या कार्याचे कौतुक होईल. मात्र अधिक आत्मविश्वासाने आर्थिक व्यवहारात अव्यवहार्य धाडस करणे टाळावे. कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. |
![]() |
उत्साहात भर पडेलमिथुन :सप्ताहाच्या सुरुवातीस जरा सावध राहणे गरजेचे ठरेल. विशेषतः लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. तसेच आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे लक्षपूर्वक हाताळणे अथवा ठेवणे गरजेचे राहील. तसेच आपले वाहन सुद्धा सुरक्षित जागी पार्क करा. चोरीची शक्यता नाकारता येत नाही. कुटुंब परिवारात वातावरण सर्वसामान्य राहील. कुटुंबातील कामासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो. उत्तरार्धात मात्र आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. पूर्वी केलेले नियोजन यशस्वी झालेले बघून उत्साहात भर पडेल. |
![]() |
आत्मविश्वास वाढेलकर्क : या आठवड्यात सुरुवातीला जरी प्रतिकूलता जाणवली तरी त्या प्रतिकूलतेवर आपल्याला मात करून पुढे जावे लागेल. आपले निर्णय योग्य ठरतील. वेळप्रसंगी इतरांचा सल्ला अथवा मार्गदर्शन उपयोगी पडेल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य द्या. कोणतेही लहान-मोठे आर्थिकविषयक निर्णय घेताना जागरूक राहणे गरजेचे राहील. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहून आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्या कार्यात गतिमानता येईल. कार्यक्षेत्रात काही नव्या योजना तसेच नवीन नियोजन करणे आपल्या कार्यासाठी पोषक ठरेल. |
![]() |
युक्तीने मार्ग सापडेलसिंह : आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. इतरांच्या म्हणण्याला अथवा मताला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल. आपलेच मत अथवा म्हणणे खरे करण्याचा अट्टहास धरू नका. काही वेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास युक्तीने मार्ग सापडेल. इतरांना समजून घ्या. आपल्या कामकाजात अपेक्षित प्रगती साधण्यासाठी अचूकता व सातत्य महत्त्वाचे ठरेल. वाद-विवाद टाळणे गरजेचे राहील. तसेच आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखा. |
![]() |
नियोजनात बदल करावा लागेलकन्या : नोकरी-धंदा अथवा व्यवसाय निमित्त दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक राहील. तसेच इतरांशी स्पर्धा टाळा. वाहतुकीचे नियम पाळणे स्वतःच्या हिताचे ठरेल. व्यवसायात मात्र काहीवेळा आपल्या नियोजनात बदल करावा लागेल. प्रवास कार्य सिद्ध होतील. परदेशगमनाचे योग आहेत. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून जुनी येणी वसूल होतील. कार्यक्षेत्र वाढल्यामुळे धावपळ करावी लागेल. |
![]() |
मनासारखा खर्च करालतूळ : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही नवीन संधी मिळतील. त्याचा उपयोग करणे आपल्याच हाती आहे. आपल्या कामात चालढकल करू नका अथवा इतरांवर अवलंबून राहणे धाडसाचे ठरेल. स्वतःची कामे स्वतःच करा. मैत्रीमध्ये व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून दूर राहा. भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. त्यासाठी शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. आर्थिक पक्ष मजबूत राहील. मनासारखा खर्च कराल. कुटुंबासाठी काही नवीन खरेदी करू शकाल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. |
![]() |
एकाग्रतेने निर्णय घेणे आवश्यक ठरेलवृश्चिक : या आठवड्यात आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडल्यामुळे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याचे प्रश्न अचानक निर्माण होऊ शकतात. स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीचे काम करावे लागेल. कामाचा ताण जाणवू शकतो. धावपळीमध्ये अथवा घाई गडबडीमध्ये कोणतेही लहान-मोठे निर्णय घेऊ नका. नोकरीधंद्यात आपण घेतलेल्या निर्णयांचे पडसाद उमटतील. शांतपणे विचार करून तसेच एकाग्रतेने निर्णय घेणे आवश्यक ठरेल. |
![]() |
मुलाखती सफल होतील
|
![]() |
कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेलमकर : आपल्या अवतीभवती वेगवान घटना घडू शकतात. त्यामुळे प्रत्येक कार्य लक्षपूर्वक करणे गरजेचे ठरेल. आपल्याला झेपतील इतक्याच जबाबदाऱ्या स्वीकारणे अपरिहार्य ठरेल. आपण जी कामे पूर्ण करू शकाल त्याविषयी कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. अति आत्मविश्वासाने घात होऊ शकतो. सर्व प्रकारचे लहान-मोठे आर्थिक व्यवहार जपून करणे गरजेचे ठरेल. कोणावरही अतिविश्वास ठेवणे घातक ठरू शकते. नोकरी, व्यवसाय-धंद्यात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरू शकतो. महत्त्वाच्या कामांबद्दल अगोदरच घोषणा करू नका. कार्यमग्न राहा. आपल्या एखाद्या लहानसहान चुकीचे ही विरोधक भांडवल करू शकतात. |
![]() |
धनलाभाचे योगकुंभ :आपल्याला या आठवड्यात भाग्याची उत्तम साथ राहील. कुटुंब परिवारातील सदस्यांचे तसेच आपल्या जीवनसाथीचे वाढते सहकार्य मिळेल. कुटुंबातील मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर वार्ता कानावर आल्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साहजनक राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. काहीवेळा अचानक धनलाभाचे योग घटित होत आहेत. मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. लहान मोठ्या कामानिमित्य अथवा पर्यटनामुळे प्रवास घडू शकतात. प्रवास कार्य सिद्ध राहतील. कुटुंब परिवारासाठी तसेच स्वतःसाठी काही नवीन खरेदी करू शकाल. नोकरीत आपल्या कार्यामध्ये आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. |
![]() |
क्रोधावर नियंत्रण आवश्यकमीन :आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो. जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. कुटुंब परिवार यातही काही जास्तीची कामे करणे गरजेचे ठरेल. त्यामुळे धावपळ आणि दगदग करावी लागेल. त्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरेल. नियोजन बद्धता व शिस्त यांचे पालन फायदेशीर ठरेल. आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीच्या ठिकाणी राजकारण तसेच गटबाजीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला राग येण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक राहील. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. |