मुंबई : फेब्रुवारी हा मुंबईसाठी हिवाळ्यातील शेवटचा आल्हाददायक महिना असतो. कारण मार्चपासून तापमान वाढू लागते आणि कधीकधी फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागतात. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच थंडीचा जोर ओसरत चालला आहे. सकाळच्या सुमारास उन्हाच्या झळा अणि रात्री थंडी अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने आज कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Weather Update)
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागात तापमान वाढलं आहे. आतापर्यंत या तापमानाची नोंद ३६ अंश झाली आहे. मुंबईमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी नाहीशी होत तापमान ३७ अंशांचा आकडा गाठत नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते असाही थेट इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका असाही सल्ला दिला जात आहे. (Weather Update)