Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Delhi Election : ‘आप’च्या पराभवानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपद सोडले

Delhi Election : ‘आप’च्या पराभवानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपद सोडले

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आमआदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आता रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री व आप नेत्या आतिशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेत सुपूर्द केला. आतिशी यांच्या राजीनाम्यानंतर सक्सेना यांनी विधानसभा बरखास्त केली आहे. आतिशी या जवळपास १४१ दिवस मुख्यमंत्रीपदावर होत्या.



अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. याआधी दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित या देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा पराभव करत भाजपाने २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता काबीज केली.

Comments
Add Comment