Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीआता नाशिकमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी

आता नाशिकमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी

मुंबई (प्रतिनिधी): म्हाडा कोकण मंडळाच्या २१४७सदनिका, ११७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात पार पडली. या सोडतीसाठी म्हाडाकडे सुमारे २४,७११ अर्ज आले होते. मात्र, सोडतीमध्ये ज्या अर्जदारांना घर लागले नाही, त्यांना आता नाशिकमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाय शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळ गाय बहुला, नांदूर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ४१३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंषण मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ‘गी-लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.

म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार : उपमुख्यमंत्री शिंदे

नाशिक मंडळाच्या कार्यालय समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, उपमुख्य अधिकारी संदीप कराळे आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदभांतील माहिती पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली, मार्गदर्शक सूबना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in था महाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्व इच्छुक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन ठाकरे यांनी याप्रसंगी केले. संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक यावेळी ठाकरे यांनी नाशिक मौहलाच्या सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणान्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, ‘मंडळातर्फे सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, खललागार व प्रॉपटर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही, अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक मंडळ अथवा म्हाड़ा प्रशासन कोणत्याही व्यवहारारा अबवा फसवणुकीस जबाबदार राहणार नाही. तसेच म्हाडाची IHLMS 2.0 भी संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक, सोपी व सुलभ आहे करिता इच्छुक अर्जदारांनी याच सोडत प्रणालीच्या सहाय्याने सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा, असेही ते पुढे म्हणाले. ६ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार ७ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून, ६ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना ६ मार्च, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. ७ मार्च, २०२५ रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -