Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीMega block : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

Mega block : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी रेल्वे लोकलबाबत सिंग्नल यंत्रणा आणि तांत्रिक बिघाड दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. त्यामुळे रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mega block on Central Railway) घेण्यात येतो. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. तर आता मध्य रेल्वेवरही उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रेल्वे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई विभागाकडून उद्या ९ फेब्रुवारी रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी १० वाजून ५८ मिनिट ते दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या ठाणे येथे मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे लोकार्पण

ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. सकाळी ११ वाजून २५ मिनिट ते दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११ वाजून १६ मिनिट ते दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १० वाजून ४८ मिनिट ते दुपारी ४ वाजून ४३ मिनिटपर्यंत शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील.

तसेच सकाळी ९ वाजून ५३ मिनिट ते दुपारी ३ मिनिट २० मिनिटापर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १० वाजून ४५ मिनिट ते सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या वांद्रे येथून शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १० वाजून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाईन आणि वेस्टर्न लाईन स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -