Study Concept : अभ्यासाच्या प्रभावी पद्धती

डाॅ. स्वाती गानू


मुलांची अशी नेहमी तक्रार असते की, मला मोटिव्हेशनची, प्रेरणेची उणीव भासते. कमतरता जाणवते. किती प्रयत्न केले तरी वेळेचे व्यवस्थापन जमत नाही. अभ्यासाला वेळ पुरत नाही. पेपर सोडवताना वेळ कमी पडतो. मुलांचे हे काॅमन प्राॅब्लेम्स असतात. अशा प्रश्नांभोवतीच घुटमळत राहण्यापेक्षा यावर कोणत्या प्रकारच्या अभ्यास पद्धती वापरल्या, तर चांगले रिझल्ट्स मिळतील याचा विचार करायला हवा. हे प्रश्न जगातील बहुतेक सगळ्याच मुलांना सतावत असतात. आज आपण काही जापनीज अभ्यास पद्धतींचा अभ्यासात कसा उपयोग करून घेता येईल ते पाहू या. या टेक्निक्सचा योग्य उपयोग केला, तर आपला आळस दूर पळून जाईल. आपली प्राॅडक्टिव्हिटी वाढेल. परीक्षेतील परफाॅरर्मन्स सुधारेल. गुण वाढतील. अभ्यासात खूप फायदा होईल. म्हणूनच हे आव्हान स्वीकारून अभ्यास करा. किमान एक महिना हे वापरून स्वतःमध्ये


सुधारणा घडवून आणता येईल.
१) कानबान बोर्ड टेक्निक :
हे टेक्निक जपानमधील कारखान्यात वापरलं जातं. ‘कानबान बोर्ड’ या जापनीज शब्दाचा अर्थ ‘व्हिज्युअल सिग्नल’ आपल्या अभ्यासाचा प्रवास पूर्ण होतो आहे असे जणू डोळे मिटून कल्पना करणं. ते चित्र डोळ्यांसमोर आणणं.
उदाहरणार्थ: एक कागद
घ्या. त्याच्यावर असाईनमेन्टचं नाव लिहा.
त्याखाली एक एक काॅलम तयार करा. अभ्यासाचं स्टेटस त्यावर लिहा.
पहिल्या काॅलमला टाॅपिकचं वाचन, दुसऱ्या काॅलमला महत्त्वाचे मुद्दे, तिसऱ्या काॅलमला वस्तुनिष्ठ प्रश्न-उत्तरं, चौथ्या काॅलमला वर्णनात्मक प्रश्न-उत्तरं, पाचव्या काॅलमला आकृत्या, सूत्रे, व्याख्या. अशी रचना, असा अभ्यास कागदावर लिहून काढा. मनात सतत बिंबवत रहा.


अभ्यासाची तीन भागांत विभागणी करा :
१)करावयाचा अभ्यास -
२)करत असलेला अभ्यास -
३)पूर्ण झालेला अभ्यास-
आपल्याला कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत? कोणत्या गोष्टी करत आहोत? कोणत्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत? काय करायचेय, काय प्रोसेसमध्ये आहे आणि काय पूर्ण झाले आहे हे कळल्यामुळे मनात गोंधळ राहत नाही. संभ्रम दूर होतो. विचारात स्पष्टता राहते. किती अभ्यास झाला? किती बाकी आहे हे कळतं.


२) सिरी सायटो सायसो टेक्निक :
सिरी म्हणजे सॉर्ट
शिटो म्हणजे सेट अँड ऑर्डर
सायसो म्हणजे शाइन
जेव्हा आपण अभ्यास करताना तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण उत्साहवर्धक असेल, प्राॅडक्टिव्ह असलं, तर आपल्याला काम करावंसं वाटतं, अभ्यास करावासा वाटतो. पण जर तुमचं डेस्क अस्ताव्यस्त असेल, वस्तू इकडे-तिकडे पडल्या असतील आणि तुम्ही बेडवर बसून अभ्यास करत असाल, तर झोपच येईल. अभ्यास करावासा वाटणार नाही. तुम्ही मन एकाग्र करू शकत नाही. झोपावंसं वाटतं. आळस येतो. कंटाळा येतो. काहीच करावंसं वाटत नाही.
आठवड्यातून एक दिवस जरी तुम्ही तुमचं डेस्क आवरून ठेवलंत, पुस्तकं नीट रचून ठेवली, उद्याच्या अभ्यासाची पुस्तकं काढून ठेवली. क्रमाने मांडून ठेवा. हे नीटनेटकं चित्र पाहून तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छा होईल.


३) इनमुरी :
इनमुरी म्हणजे छोटीशी डुलकी किंवा नॅप.
अभ्यास करताना आपण सतत लक्ष एकाग्र करतो. त्यामुळे मेंदूला थकवा येतो. डोळ्यांवर ताण येतो. दोन-तीन तास अभ्यास केल्यास एक दहा मिनिटांची छोटीशी डुलकी किंवा नॅप घ्यायला हरकत नाही. लहान मुलांच्या शिशिरच्या मुलांना बेंचवर मान ठेवून झोपायला सांगितले जाते. पण मोठ्या मुलांना शाळेत छोटी नॅप घ्यायला परवानगी नाही मात्र जपानमधील शाळांत मुलं नॅप घेऊ शकतात. तिथे या नॅपकडे सेल्फ केअर म्हणून पाहिलं जातं आणि खूप महत्त्वाचं मानलं जातं. अशी विश्रांती मिळाल्यानंतर मुलांची मनं प्रफुल्लित होतात. मुलांची इफिशियन्सी वाढते.
पुन्हा खेळायला, अभ्यास करायला तयार होतात. मोठी विश्रांती घेण्यापेक्षा ही छोटी नॅप उपयोगी ठरते. ताण कमी होतो. सजगता वाढते. ओझं कमी होतं. मन नाराज असलं, दुःखी
असलं तर मूड बदलतो. ही इनमुरी टेक्निक वापरून पाहा.


४) कायझेन टेक्निक :
हे अभ्यास करण्यास उपयुक्त असे टेक्निक म्हणजे रोज स्वतःमध्ये छोट्या-छोट्या दुरुस्त्या करणं. या छोट्या दुरुस्त्यांचा आपल्या अभ्यासावरच नव्हे तर आयुष्यावरही खूप मोठा परिणाम होतो. आपल्याला वाटतं एवढ्या छोट्या बदलाने काय होणार पण हा छोटा बदल कालांतराने मोठा होतो. आपण स्वतःत एक टक्का बदल केला, थोडी थोडी जरी सुधारणा केली तरी मोठी सुधारणा होते.


५) कायकुकू टेक्निक :
तुम्हाला तुमच्यात कोणताही मोठा बदल घडवून आणायचा असेल, तर हे टेक्निक खूप उपयुक्त आहे. एखादा प्राॅब्लेम सोडवताना, त्याच्याशी डील करताना हे तंत्र कामास येते. उदाहरणार्थ अभ्यास होत नाही, स्क्रीन टाईम वाढलाय, मित्र-मैत्रिणींचा प्रभाव किंवा डिजिटल माध्यमांचा ॲडिक्शन अशा मोठ्या समस्यांमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी हे टेक्निक वापरता येईल. यामध्ये स्वतःला पाच Wh questions विचारा. जसे की, मोबाईलमुळे तुमचा अभ्यास होत नसेल, तर स्वतःला हे प्रश्न विचारा.
१) मी हे का करतोय?
२) मी मोबाइलचा गुलाम आहे का?
३) माझा रिमोट कंट्रोल मोबाइलकडे
आहे का?
४) हे करून मला काय मिळणार आहे?
५) मोबाइलवर मी जे पाहतोय ती व्यवस्था कोण चालवतंय?


असे प्रश्न स्वतःला विचारले की, समस्येचे मूळ कारण कळतं. आपण ती गोष्ट दूर करू शकतो. आणि आपल्या अभ्यासात संपूर्ण लक्ष देऊ शकतो.स्वतःची प्रगती करू शकतो. या अभ्यास पद्धती आणि टेक्निक्स जर तुम्ही नीट समजावून घेतल्या आणि अमलात आणल्या, तर अभ्यासातच नाही तर इतर कामं करतानाही उपयोगी ठरतील.

Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.