Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीDelhi Assembly Election 2025: काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Delhi Assembly Election 2025: काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेस पक्ष ७० सदस्यीय विधानसभेमध्ये सलग तिसऱ्यांदा आपले खाते खोलण्यास अयशस्वी ठरला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये २.१ टक्क्यांची थोडीशी सुधारणा झाली आहे. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दावा केला आहे की ते लोकांचा विश्वास पुन्हा जिंकतील आणि २०३०मध्ये आपले सरकार बनवतील.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा सुपडा साफ झाला आहे. पक्षाच्या अधिकतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेसचे केवळ तीन उमेदवार आपले डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचवू शकले. यात कस्तुरबा नगर येथून अभिषेक दत्त जे दुसऱ्या स्थानावर राहणारे एकमेव काँग्रेस नेते आहेत. या यादीत नांगलोई जाट येथून रोहित चौधरी आणि बादली येथून देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. अधिकतर काँग्रेस उमेदवार हे भाजप अथवा आपनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. मात्र काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार एआयएमएआयएच्या उमेदवारांच्याही मागे राहिले.

‘मालक समजणाऱ्या अहंकार, अराजकतेचा पराभव’

 

काँग्रेसने केला ‘आप’चा गेम

काँग्रेसच्या वोट शेअरमध्ये थोडीशी सुधारणा ही आप पक्षासाठी चांगलीच महागडी ठरली.या निवडणुकीत काँग्रेसने आपचा गेम केला. अनुसूचित जाती आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. निवडणुकीत आपच्या वोट शेअरमध्ये १० टक्के घसरण झाली. आम आदमी पक्षाला ४३.१९ टक्के मते मिळालीतर २०२०च्या निवडणुकीत ५३.६ टक्के वोट शेअर मिळाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -