Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीArvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल

Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची सरशी होत असतानाच आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ३१३८ मतांनी पराभव केलाय.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गेल्या ५ फेब्रुवारी रोजी १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर एकूण ६०.५४ टक्के मतदान झाले होते. नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीच्या ८ फेऱ्यांनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्‍या १३ फैर्‍यांपैकी दहाव्‍या फेरीत केजरीवाल हे १८४४ मतांनी पिछाडीवर राहिले. अखेर मतमोजणीच्‍या तेराव्‍या फेरीनंतर ३१३८ मतांनी प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे.

दारूनं केला घोटाळा, ‘आप’चा गड ढासळला

अरविंद केजरीवाल यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्‍ली मतदारसंघात तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शीला दीक्षित पराभव केला होता. यानंतर त्‍यांनी ३ वेळा या विधानसभा मतदारसंघातचे प्रतिनिधित्व केले होते. विशेष म्‍हणजे या मतदारसंघात दिवगंत माजी मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीही निवडणूक लढवली होती. केजरीवालांच्‍या पराभवात संदीप यांचेही योगदान राहिले. ते स्‍वत: पराभूत झाले असले तरी केजरीवालांना धक्‍का दिल्‍याचे समाधान त्‍यांना लाभले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -