Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Valentine Week Rose day special : तुमच्या प्रियकर-प्रेयसीसाठी गुलाब निवडताय जाणून घ्या रंगाचे अर्थ

Valentine Week Rose day special :  तुमच्या प्रियकर-प्रेयसीसाठी गुलाब निवडताय जाणून घ्या रंगाचे अर्थ

मुंबई : फेब्रुवारीचा पहिला आठवडा प्रेमवीरांसाठी खास असतो. जानेवारी संपताच प्रेमाचा जणू नवा ऋतूच बहरतो. तरुणाईचा या दिवसांमध्ये विशेष उत्साह दिसून येतो. प्रेमाला वय आणि दिवस नसतो हे कितीही खरं असलं तरी ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत प्रेमवीरांच्या प्रेमाचं अनोखं सेलिब्रेशन सुरु असतं. या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही बाजूने भेटवस्तूंचा वर्षाव होतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे भेटवस्तू देण्यातही तरुणाईपुढे नवं आवाहन असतं.

फेब्रुवारीच्या ७ तारखेला रोझ डे साजरा केला जातो. या रोझ डेला गुलाबाच्या फुलांची देवाणघेवाण होते. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जात. गुलाब हा प्रेमाचा राजा असून गुलाब देऊन प्रेमीयुगुल आपलं प्रेम व्यक्त करतात. गुलाबाला प्रेमापासून ते सजावटीपर्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गुलाबाचे देखील अनेक रंगछटा आहेत. जसजसे गुलाबाचे रंग बदलतात तसतसे त्याचे अर्थही निराळे होतात.

गुलाबाच्या फुलांचे रंग आणि अर्थ पुढीलप्रमाणे :-

लाल रंगातील गुलाब प्रेमाचं प्रतीक म्हणून दिल जात. पांढऱ्या रंगातील गुलाब हे शुद्धतेचं प्रतीक आहे. गुलाबी रंगातील गुलाब हे कौतुकाचं प्रतीक आहे. पिवळ्या रंगातील गुलाब हे मैत्रीचं प्रतीक म्हणून दिल जात. . जांभळ्या रंगातील गुलाब एकतर्फी प्रेमाचं प्रतीक म्हणून दिल जात.

जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकमधील डेज

७ फेब्रुवारी – रोझ डे ८ फेब्रुवारी – प्रपोज डे ९ फेब्रुवारी – चॉकलेट डे १० फेब्रुवारी – टेडी डे ११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे १२ फेब्रुवारी – हग डे १३ फेब्रुवारी – किस डे १४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे

आज रोझ डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठी कोणतं गुलाब निवडाल ?

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >