अलिबाग : अलिबाग येथील उमटे धरणातून (Alibaug Umte Dam) मिळणाऱ्या पाण्यातून ४७ गावांतील लाखो नागरिकांची तहान भागवली जाते. या धरणातील पाण्यावर तालुक्यातील गावे अवलंबून आहेत. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी डिसेंबर महिन्यापासून पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपात करण्यात येते. मात्र यंदा ही पाणीकपात फेब्रुवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा येईपर्यंत अलिबागकरांवर पाणीटंचाईचे (Water Shortage) सावट निर्माण झाले आहे.
Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक
मिळालेल्या माहितीनुसार, उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरण बांधून ४७ वर्षे झाली असून, धरणातील गाळ काढला गेला नसल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, गाळ काढण्याकडे राजिपचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शेकापच्या माध्यमातून आणि राजिपच्या परवानगीने या धरणातील काहीअंशी गाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने हे गाळ काढणे थांबले गेले. मात्र धरणात पाणी असल्याने गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. (Water Shortage)
उमटे धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, पावसाळा येईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक आहे. यासाठी १ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणात ५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील गाळ मार्च महिन्यापासून पाणी पातळी कमी झाल्यानंतर काढण्यास सुरुवात केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता निहाल चवरकर यांनी म्हटले.