नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एका शाळेत पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. जुन्या दिल्लीच्या अल्कॉन स्कूलमध्ये बॉम्बेच्या धमकीचा कॉल आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना माघारी पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड टीम घटनास्थळी आहेत.
नोएडाच्या शाळेतही मिळाली होती धमकी
याआधी ६ फेब्रुवारीला नोएडाच्या स्टेप बाय स्टेप स्कूल, द हेरिटेज स्कूल, ज्ञानश्री स्कूल आणि मयूर स्कूलमध्ये स्पॅम ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळाली होती. धमकी मिळाल्यानंतर तताक्ळा विविध पोलिसांच्या टीम्स, बॉम्ब स्क्वॉड, अग्निशमन दल, डॉग स्क्वॉड आणि बीडीडीएस टीम घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता काहीही आढळले नाही.
दिल्लीच्या शाळांना याआधीही धमकी
दिल्लीतील शाळांना मिळालेली बॉम्बची धमकी हे काही पहिलेच प्रकरण नाही तर याआधीही अशा प्रकारच्या धमकी मिळाल्या आहेत. याआधी दिल्लीच्या द्वारका येथील डीपीएस, पश्चिम विहारच्या जेडी गोएंका शाळांसह अनेक शाळांना धमकी मिळाली होती. यानंतर १३ डिसेंबरला दिल्लीच्या १६ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.सकाळी साडेचारच्या सुमारास कॉल आला होता. त्यानंतर तातडीने तपास करण्यास आला. मात्र शाळांमध्ये काही आढळले नव्हते.