
मुंबई : मुंबईकरांना (Mumbai Local) रविवारी प्रवास करायचा झाल्यास त्या प्रवासाची पुरती वाट लागते. कारण रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) देखभाल आणि तांत्रिक बिघाडाबाबत दुरुस्ती कामे हाती घेतली जातात. दरम्यान या आठवड्यात फक्त रविवारच नाही तर शनिवारीही प्रवाशांचे हाल होणार आहेत. (Western Railway)
/>
पश्चिम रेल्वेवर १३ तासांच्या जम्बो ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत ट्रॅक दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा अपडेट आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. शनिवार ८ फेब्रुवारी आणि रविवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे. यावेळी ग्रॅन्ट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे.
ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच काही ट्रेन्स या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच चर्चगेटपर्यंत धावणाऱ्या काही ट्रेन्स या वांद्रे ते दादरपर्यंत धावतील किंवा रद्द केल्या जातील.