मुंबई: परदेशी फिरायला जावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र अनेकदा व्हिसामुळे तसेच बजेटमुळे काहींना आपले हे प्लान रद्द करावे लागतात. तुम्हालाही परदेशात जायचे आहे मात्र व्हिसाचे तसेच बजेटचे टेन्शन नकोय तर आम्ही तुम्हाला पर्याय देतोय.
जर तुम्ही फॉरेन ट्रिपचा प्लान करत आहात तर अनेक देश व्हिसा फ्री आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. तसेच हे सुंदर देश युरोपीय देशांच्या तुलनेत स्वस्तही आहेत. यामुळे तुमच्या खिशालाही कात्री बसणार नाही. बजेटमध्ये असल्याने तुम्ही फिरण्याचा आनंदही अधिक घेऊ शकता.
भूतान
हिमालयाच्या कुशीत वसलेले भूतान हे भारतीय पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणीय ठरले आहे. भारतीयांना येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तरीही तुम्ही व्होटर आयडी कार्डच्या मदतीने भूतान फिरू शकता.
मालदीव
सुंदर द्वीपांचा देश मालदीव भारतीय पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्ही फिरायला जाण्याची प्लानिंग करू शकता कारण भारतीयांसाठी मालदीव व्हिसा फ्री आहे येथे तुम्ही ३० दिवस राहू शकता.
बार्बाडोस
बार्बाडोस जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची गरज नसते. तसेच व्हिसाशिवाय तुम्ही येथे अधिकाधिक ९० दिवस राहू शकता. बार्बाडोस सुंदर द्वीपांपैकी एक आहे.
श्रीलंका
श्रीलंका देशाने १ ऑक्टोबर २०२४पासून भारतीयांसाठी व्हिसा फ्री एंट्रीची सुरूवात केली आहे. व्हिसाशिवाय भारतीय श्रीलंकेत अधिकाधिक ६ महिन्यांपर्यंत राहू शकतात. श्रीलंका आपली नैसर्गिक सुंदरता आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते.
मॉरिशस
मॉरिशस भारतीयांसाठी व्हिसा फ्री एंट्रीची सुविधा देतात. येथे तुम्ही ९० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहू शकता.