Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेमीरा-भाईंदर शहरात डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो धावणार

मीरा-भाईंदर शहरात डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो धावणार

मीरा-भाईंदर (प्रतिनिधी): मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग १ चे काम जलदगतीने सुरू असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून, डिसेंबर २०२५ मध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार आहे. मिरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होती. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्यावाचत आणि भविष्यातील बोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर उपस्थितीत होते. यावेळी दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० पैकी ३ मार्गिका या अवजड वाहनांसाती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याचावत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती आयुक्त संजम काटकर यांनी दिली. मिरा भाईंदर शहरात दहिसर भाईंदर मेट्रो मार्गीका ९ तयार करण्यात येत आहे, कंत्राटदाराला देखील २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या या प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक व मार्गकिचे काम पूर्ण केले जात आहे. या मेट्रो मार्गीका ९ चे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. दहिसर ते सुभाषचंद्र बोस पर्यंत टप्पा-१ आणि पुढील टप्प्यात उत्तन पर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. दुसऱ्या टण्यात मेट्रो मार्ग आणि कारशेडचे काम केले जाणार आहे. मेट्रो मार्गकिच्या मूळ मार्गावर स्थानिक नागरिकांची घरे बाधित होत असल्याने स्थानिकांचा विरोध असल्याने त्यावर पुढील महिन्यात एनएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेऊन घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रपत्न केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली, मिरा भाईंदर शहराच्या मुख्यमार्गावर मेट्रो रेल्वे खाली तीन उड्डाणपुल तयार करण्यात येत आहे. यातील अन्य दोन पुलाचे काम केले जात असून दुसऱ्या पुलाचे लोकार्पण येत्या १९ फेब्रुवारीला केले जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -